
वाशिष्ठी नदीवरील पेठमाप- जोडणार्या पुलाच्या कामाने गती घेतली
चिपळूण शहरातील अत्यंत महत्वाचा आणि वाहतुकीवर उत्तम पर्याय ठरणार्या वाशिष्ठी नदीवरील पेठमाप- जोडणार्या पुलाच्या कामाने गती घेतली आहे. या पुलाच्या जोडरस्त्यासाठी ६ कोटी रूपयांचाा निधी मंजूर झाल्याने तोही प्रश्न मार्गी लागला आहे. पावसाळ्यापूर्वी पुलांचे बहुतांशी काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने ठेकेदार कंपनीने नियोजन केल्याने उभारणीलाही वेग आला आहे.चिपळूण शहरातील पेठमाप आणि मुरादपूर हे दोन मोठी लोकवस्ती असणारे भाग वाशिष्ठी नदीमुळे विभागलेले आहेत. इंग्रजांच्या काळात येथे फरशी बांधण्यात आली होती. ओहोटीवेळी या फरशीवरून वाहतूक केली जात होती. आताही काही प्रमाणात ती फरशी अस्तित्वात असून त्यावरून हलकी वाहने ये-जा करतात. परंतु भरतीच्या वेळी तसेच पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे येथील वाहतूक तसेच येण्या-जाण्याचा मार्गही बंद पडतो. साहजिकच परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होते. यामुळे येथे पूल व्हावा अशी मागणी नागरिक कित्येक वर्षे करत होते. या मागणीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी मुरादपूर-पेठमाप असा पूल शासनाकडून मंजूर करून घेतला. त्यासाठी सुमारे १२ कोटी रूपये शासनाने मंजूर केले आहेत. www.konkantoday.com