दृष्टीबाधित नंदकुमार शिंदे यांना नॅबने आधार देऊन स्वत: च्या पायावर उभे केले
नॅब चिपळूण राष्ट्रीय अंध कल्याण संघ नॅब चिपळूणच्यावतीने चिपळूणचे अंधसदस्य नंदकुमार शिंदे (रा. नांदिवसे, राधानगर) यांनी अपंगत्वावर मात करत गेले वर्षभर प्रायोगिक तत्वावर सुरू केलेला भाजी व्यवसाय आता लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये प्रत्यक्षात सुरू करून अपंगत्वाला प्रेरणा दिली आहे.
दृष्टीबाधित नंदकुमार शिंदे हे अपंगत्व आल्याने निराधारही होते. कुटुंबातील एकटेच सदस्य कसे जगायचे या विवंचनेत असताना त्यांची भेट प्राथमिक आरोग्य केंद्र दादरच्या डॉ. ज्योती यादव यांच्याशी झाली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी नॅब चिपळूणमध्ये संपर्क करण्यास सांगितल. मागील एक दोन वर्षापासून ते प्रत्यक्षात नॅबच्या संपर्कात येऊ लागले. नॅबच्या मार्गदर्शनानुसार त्यांना फिरते भाजी विक्रीचा व्यवसाय तसेच अपंगत्वाच्या अनुषंगीक सोयी सवलतींचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तर नुकतेच त्यांच्या व्यवसायाचे उदघाटन नॅबचे अध्यक्ष सुचय रेडीज, प्रशासकीय अधिकारी भरत नांदगावकर, जनसंपर्क अधिकारी संदीप नलावडे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी नवीन व्यवसायाला शुभेच्छा देण्यात आल्या. www.konkantoday.com