
दापोली एसटी आगारातील प्रशासन विभागावरील पत्रे फुटल्याने या संपूर्ण विभागात गळती लागली
एसटी महामंडळ दिवसेंदिवस तोट्यात जात असून आता इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नसल्याचे दिसत आहे
दापोली एसटी आगारातील प्रशासन विभागावरील पत्रे फुटल्याने या संपूर्ण विभागात गळती लागली आहे. यामुळे एक संगणकही नादुरूस्त झाला असून कर्मचार्यांना आता आगार व्यवस्थापकांच्या कक्षात बसून काम करावे लागते.
दापोलीत गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने या फुटलेल्या पत्र्यामधून कार्यालयाच्या सिलिंगवर पाणी गळते व सिलिंगमधून ते सर्व पाणी कार्यालयात पडते. या गळतीमुळे कार्यालयातील सर्व महत्वाची कागदपत्र भिजत असल्याचे कर्मचार्यांनी सांगितले.
दापोलीत पाऊस सुरू झाल्यावर या पत्र्यावर टाकण्यासाठी रत्नागिरी येथून ताडपत्री पाठविली आहे. मात्र मोठा पाऊस पडत असल्याने ही ताडपत्री टाकण्यासाठी पत्र्यावर जाण्याचा कोणी धोका पत्करत नसल्याने पाऊस कमी होईपर्यंत ही ताडपत्री टाकता येत नसल्याची माहिती आगार व्यवस्थापक मृदुला जाधव यांनी दिली. पाऊस कमी झाल्यावर मनुष्यबळ उपलब्ध झाल्यावर लगेचच ही ताडपत्री टाकण्यात येईल. www.konkantoday.com