
कोकणातील धबधब्याच्या सोयीसुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
निसर्गसौंदर्य लाभलेल्या कोकणचे सौंदर्य पावसाळ्यात अधिक खुलून येते शेकडो फूट उंचीवरून फेसाळत कोसळणारा राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण येथील परीटकडा आणि सवतकडा जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपर्यातील पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनलेला आहे. पावसाळ्यामध्ये खुललेला येथील निसर्ग परिसर पर्यटकांना वेड लावणारा आहे. गेल्या काही वर्षामध्ये पर्यटकांची पहिली पसंती ठरलेल्या चिपळूण येथील मुंबई गोवा महामार्गावरील सवतकडा धबधब्याच्या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक येत असले तरी त्यांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधांची त्या ठिकाणी कोणतीही सोय नाही
या ठिकाणाला पर्यटन साज दिल्यास, त्याच्यातून हजारो रुपयांच्या उलाढालीतून स्थानिकांसह अन्य लोकांना रोजगार निर्मिती होवू शकते. त्यादृष्टीने प्रयत्नांची आवश्यकता भासत आहे. www.konkantoday.com