एप्रिल 2022 पासून सर्व सरकारी वाहने ‘इलेक्ट्रिक’ -आदित्य ठाकरे
एप्रिल 2022 पासून सर्व सरकारी वाहने ‘इलेक्ट्रिक’ असतील. शिवाय मुंबईसह सात शहरांमध्ये मुख्य मार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी तब्बल 2500 चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. एवढेच नव्हे, तर नवीन निवासी इमारतीत किमान 20 टक्के पार्किंग ठेवणे विकासकाला बंधनकारक करण्यात आले आहे.
पर्यावरण आणि वातावरण बदलमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत राज्याचे इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले. गुंतवणूकदार, उत्पादक आणि ग्राहकांना मोठय़ा प्रमाणावर सवलत जाहीर करणे आणि महाराष्ट्राला इलेक्ट्रिक वाहन वापरात नंबर वन बनवणारे असे हे धोरण आहे. पर्यावरणाला अनुसरूनच राज्य सरकार हे धोरण आखत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
www.konkantoday.com