
NEET परीक्षेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे परीक्षा केंद्र मंजूर-मंत्री उदय सामंत
वैद्यकीय आणि औषधनिर्माण-शास्त्र अभ्यासक्रमासाठी NEET प्रवेश परीक्षेची आवश्यकता असते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ही परीक्षा देतात. परंतु रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये या परीक्षेसाठी केंद्र उपलब्ध नव्हते. त्यामुळे या भागातील बरेच विद्यार्थी गोवा हे केंद्र परीक्षेसाठी घेत होते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने राज्यात प्रवेश करण्यासाठी स्वॅब टेस्ट बंधनकारक केली होती. NEET परीक्षा केंद्र हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये व्हावी अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होती.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देखील केंद्र रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातच व्हावी यासाठी मागणी केली होती. या मागणीसाठी सामंत यांनी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांची भेट घेतली होती व रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दोन केंद्र मंजूर करून घेतली.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांनी 2021 च्या परीक्षेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे दोन केंद्र मंजूर केली आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना गोवा येथे जाण्याची आवश्यकता नसणार आहे. अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. परीक्षा देणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातून सुमारे 500 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 300 विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यातूनच परीक्षा देता येणार आहे.
www.konkantoday.com
