
शरद पवार यांच्यावरील प्रेमापोटी या फॅनने आपल्या पाठीवर काय करून घेतले बघा
सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात आपल्या नेत्याबद्दल इतका आदर व प्रेम असते की त्यांच्यासाठी ते काहीही करण्यास तयार होतात
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निस्सीम श्रद्धा असलेला असाच एक त्यांचा फॅन आहे . अक्षय साळवे नावाच्या या फॅनने चक्क आपल्या शरीरावर शरद पवार यांचा चेहरा असलेला टॅटू काढला आहे.
प्रेमापोटी अक्षयने आपल्या संपूर्ण पाठीवर शरद पवार यांचा टॅटू काढला आहे. विशेष म्हणजे हा टॅटू पर्मनंट म्हणजेच कायमस्वरुपी आहे.अक्षय साळवे असं टॅटू पाठीवर काढलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. संदीप जोशी या कलाकाराने हा टॅटू अक्षयच्या पाठीवर काढला. अक्षय हा मूळचा बारामती तालुक्यातील मेदड गावचा रहिवासी आहे. तो सध्या मुंबईत व्यवसायानिमित्त स्थायिक झालेला आहे.
विधानसभा निवडणुकांच्या वेळी साताऱ्यामध्ये शरद पवार यांनी प्रचार सभा घेतली होती. या सभेत पाऊस आल्यानंतरही शरद पवारांनी पावसात भिजत सुरु ठेवलेले भाषण प्रचंड गाजले होते. यामुळे अनेक जण प्रभावित झाले होते. हे दृश्य पाहून अक्षयही भारावून गेला होता. त्याच वेळी अक्षयने मुंबईत हा टॅटू काढून घेतला होता.
आपल्या पाठीवरील ही कारागिरी खुद्द शरद पवार यांनी पाहावी, अशी अक्षयची मनापासून इच्छा होती. गेली दीड वर्ष तो शरद पवार यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत होता. अखेर रविवारी ही संधी चालून आली. अक्षयने शरद पवारांची नुकतीच भेट घेतली. दीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर अक्षयने शरद पवारांना आपल्या पाठीवर काढेलला टॅटू दाखवला. यावेळी शरद पवारांनीही अक्षयचे कौतुक केले आपले कार्यकर्ते आपल्यावर किती प्रेम करतात हे पवार साहेबांना हे दिसून आले
www.konkantoday.com
