
निसर्ग वादळामुळे कासवांचे गाव असलेल्या वेळासची दुर्दशा
मंडणगड तालुक्यातील सुंदर समुद्रकिनारा व नारळी पोफळीच्या बागा असे निसर्गसमृद्ध असलेल्या वेळास गावाला आज निसर्गानेच म्हणजे निसर्ग वादळाने मोठा फटका दिल्याने गावाचे रूपच आता पालटले गेले आहे. चक्रीवादळात येथील नारळी, पोफळी, आंबा, फणसाची झाडे उदध्वस्त झाली असून या भागातील घराचे व कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. वेळास गावची ओळख ही कासवांचे प्रजनन स्थळ म्हणून आहे. यासाठी अनेक पर्यटक गावात येतात. परंतु आता वादळामुळे या सर्वांवर मोठा विपरित परिणाम झाला आहे.
www.konkantoday.com
