पोस्ट मॅट्रिक विद्यार्थ्यांसाठी सन २०२०-२०२१ (२ सत्र ) ची शिष्यवृत्ती विद्यार्थांना अद्याप मिळाली नाही
(आनंद पेडणेकर )
आपले सरकार महा DBT पोर्टल वरती पोस्ट मॅट्रिक विद्यार्थ्यांसाठी सन २०२०-२०२१ (२ सत्र ) ची शिष्यवृत्ती विद्यार्थांना अद्याप देण्यात आलेली नाही. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना २ सत्रात दिली जाते,परंतु शैक्षणिक वर्ष संपले तरी पहिल्या सत्राचे reedem अजूनही देण्यात आलेले नाही.
DBT पोर्टल वरील शासकीय घोळात शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे,जोपर्यंत ह्या शिष्यवृत्ती मधून मिळणारी शैक्षणिक फी संबंधित शिक्षण संस्थांना जमा होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचे डिग्री चे प्रमाणपत्र मिळणार नाही.शासकीय दुरवस्थेने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.माननीय मुख्यमंत्री यांचा फोटो या पोर्टल च्या दर्शनीय उजव्या बाजूला दर्शविण्यात आला आहे,तसेच या DBT पोर्टल वर विविध ८ योजना असून प्रत्येक योजनेचा लाभ अनेक विद्यार्थी घेत आहेत,पण या वर्षी शासकीय उदासीनतेमुळे या विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. २ हप्त्यामध्ये दिली जाणारी शिष्यवृत्तीतील पहिल्या हप्त्याचा redeem अद्याप उपलब्ध करून दिलेला नाही.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ संपून २०२१-२२ ची प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे, आणि २०२०-२१ उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याना DBT पोर्टल वरील गोंधळामुळे शिष्यवृत्ती व शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांचे प्रमाण पत्र मिळणार नाही.
महा DBT पोर्टल वरती शिष्यवृत्ती बद्दल तक्रार केली असता, redeem उपलब्ध झाल्यावर आपली शिष्यवृत्ती आपल्या खात्यात आणि आपल्या महाविद्यालयाच्या नावे जमा केली जाईल असे सांगण्यात येते,पण हि रक्कम कधी जमा करण्यात येईल या बद्दल काहीही सांगत नाहीत.तरी माननीय मुख्यमंत्री साहेब तसेच माननीय उच्च शिक्षण मंत्री आणि संबंधित सर्व मंडळींनी याकडे त्वरित लक्ष घालून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे अशी मागणी होत आहे
www.konkantoday.com