कोकणातील कांदळवन संवर्धनासाठी उपलब्ध होणार २२२ कोटींचा निधी
निसर्गाचा आणि खाडीकिनार्यांच्या भागातील पर्यावरणाचा समतोल राखणार्या कांदळवनांच्या माध्यमातून शिंपले पालन, खेकडे पालन, शोभिवंत मासेपालन व कालवे पालनाला पर्यटनाची जोड देण्याची महत्वाकांक्षी योजना आहे. त्यासाठी युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामचा ग्रीन क्लायमेट फंड आणि सरकारमार्फत २२२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यातून कांदळवन संरक्षण व रोजगार निर्मिती होणार आहे.
कांदळवनाच्या माध्यमातून खेकडे पालन, कालवे पालन, शोभिवंत मासेपालन आणि कांदळवन पर्यटनातून उपजिविकेच्या प्रकल्पाला मिळालेल्या यशानंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, वेंगुर्ला, रत्नागिरीतील दापोली, गुहागर, राजापूर व रत्नागिरी, रायगडमधील श्रीवर्धन व अलिबाग आणि पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणूमध्ये राबविण्यात येणार आहे.
www.konkantoday.com