सभेला गैरहजर राहणार्या कामचुकार अधिका यांविरुद्ध कारवाई करण्याचे समाजकल्याण सभापतींचे संकेत
महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार्या सभेलाच अधिकारी अनुपस्थित राहत असल्याने समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात चर्चा करता येत नाही. ते प्रश्न प्रलंबित राहतात. त्या अधिकाऱ्यांविरोधात जिल्हा परिषद समाजकल्याण सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा अधिकाऱ्यांविरोधात कारवाई व्हावी, यासाठी लवकरच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी सांगितले, तसेच त्यांनी अशा कामचुकार अधिकाऱ्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
www.konkatoday.com