लॉकडाऊन शिथिलेतवरूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या मंत्र्यांत मतभेद
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, सरकारमधील महत्त्वाचे निर्णय आणि स्वबळावरून महाविकास आघाडीच्या घटकपक्षांमधील धुसफूस उघड झाली असतानाच लॉकडाऊन शिथिलेतवरूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या मंत्र्यांत मतभेद असल्याचेही दिसून येत आहे. हातावर पोट असलेल्या घटकांचा विचार करून नियम शिथिल करण्याचा दोन्ही काँग्रेसच्या मंत्र्यांचा सूर आहे. तर कोरोनाची दुसरी संपली नाही आणि तिसरी लाट येण्याच्या भीतीने मुख्यमंत्री सावध भूमिकेत आहेत. त्यामुळे ठाकरे सरकाला शिथिलतेच्या या वादाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांत मुख्यमंत्री ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, याची उत्सुकता राज्यभर आहे.
www.konkantoday.com