
राजापूर एस.टी. आगारातील वाहक अजय निचल यांनी उदरनिर्वाहासाठी शोधला नवा पर्याय
कोराेनाच्या मारामारीमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या उद्योगधंदे अडचणीत आले कोरोनामहामारीमध्ये आर्थिकदृष्ट्या कुचंबणा झालेल्या राजापूर एस.टी. आगारातील चालक तथा वाहक अजय निचल यांनी उदरनिर्वाहासाठी स्वतःचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. आर्थिकदृष्ट्या तोट्यात असलेल्या एस.टी.चे चाक कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अधिकच खोलात रूतले आहे. त्याचा फटका एस.टी. कर्मचार्यांना बसून तीन-तीन महिने पगाराची प्रतिक्षा करावी लागत आहे. अशा स्थितीमध्ये श्री.निचल यांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता कोरोनाच्या महामारीमध्ये उत्पन्नासाठी शोधलेला नवा पर्याय शोधला . सोलापूर जिल्ह्यातील रहिवाशी असलेले श्री. निचल कला शाखेचे पदवीधर असून त्यांची एस.टी. महामंडळामध्ये रोजंदारी वर्ग-1 मध्ये 2019 मध्ये नियुक्ती झाली. त्यानंतर सलग दोन वर्ष कोरोना महामारी राहिल्याने श्री. निचल यांची नोकरीमध्ये कायम होवू शकले नाही. अशाही स्थितीत ते कार्यरत राहीले. मात्र, नियमित न मिळणारे काम आणि वेळेवर न होणारे पगार यामुळे त्यांची आर्थिकदृष्ट्या कुचंबणा झाली आहे. त्याच्यातून स्वतःसह आई, पत्नी आणि मुले अशा मोठ्या कुटुंबाचा दैनंदीन खर्च, खोलीचे भाडे वा अन्य खर्चासाठी आवश्यक पैशाची जुळवाजळव करताना त्यांची पुरती दमछाक झाली.स्थितीमध्ये त्यांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. शहरातील भटाळी आणि परिसरामध्ये होणार्या भाजी विक्रीतून चार पैसे अर्थाजनासाठी हातामध्ये मिळत असल्याचे ते सांगतात.
www.konkantoday.com