रत्नागिरी तालुक्यातील भोके येथे एका घरात अज्ञात चोरट्यांनी ऐवज लंपास केला.

रत्नागिरी तालुक्यातील भोके येथे एका घरात अज्ञात चोरट्यांनी घरातून ११,१०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोके गावात २ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९ ते ३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ७ या दरम्यान ही घरफोडी झाली.

मैथिली योगेश गावडे (२३, रा. निवळी, गावडेवाडी, रत्नागिरी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चोरट्यांनी घरातून ५,५०० रुपये रोख रक्कम आणि ५,६०० रुपये किमतीचे ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (सन २००० पूर्वी तयार केलेले) चोरून नेले आहेत. चोरट्यांनी घराची खिडकी तोडून घरात प्रवेश केला आणि लोखंडी कपाटातून दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button