मुंबईत व्हेल माशाच्या उलटीची विक्रीसाठी आलेली टोळी ताब्यात २७ कोटींचा माल ताब्यात
व्हेल माशाच्या उलटीची विक्रीसाठी आलेल्या पाच जणांना मालाड आणि अंधेरी येथून वन विभागाने अटक केली. त्या पाच जणांकडून एकूण २७ किलो व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. जप्त केलेल्या उलटीची किंमत २७कोटी रुपये इतकी आहे.
व्हेल माशाच्या उलटीची तस्करीसाठी काही जण मालाड आणि अंधेरी येथे येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. गजेंद्र हिरे, उप वन संरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष कंक, वन अधिकारी, देशमुख, आरएफओ शहापूर, वनपाल रवींद्र तवर, नारायण माने, गणेश परहर, रामा भांगरे यांच्या पथकाने तपास सुरू केला. मालाड पूर्व येथे चार जण व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने तेथे बनावट ग्राहक पाठवला.तेव्हा त्या चौघांनी शुक्रवारी भेटूया असे सांगितले. त्यानंतर शुक्रवारी ते चौघे मालाड पूर्व परिसरात आले. वन विभागाच्या पथकाने सापळा रचून दिवाकर शेट्टी, किरीट वडवाना, दादाभाऊ घनवट, राजेश मिस्त्रीला ताब्यात घेतले. त्या चौघांकडून 8 किलो व्हेल माशाची उलटी जप्त केली. त्या चौघांना व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीतून काही रक्कम मिळणार होती.
तर दुसरी कारवाई शनिवारी वन विभागाने अंधेरी परिसरात केली. अंधेरी परिसरात एक जण व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वन विभागाने क्राईम ब्रँच युनिट 10 च्या मदतीने अंधेरी परिसरात सापळा रचला. सापळा रचून सय्यद सिबूलला तुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 19 किलो व्हेल माशाची उलटी जप्त केली. सय्यद हा मूळचा बंगळुरूचा रहिवासी असून तो तीन महिन्यांपासून मुंबईत विविध हॉटेलमध्ये राहत होता. त्याला बंगळुरू येथील एकाने ती उलटी विक्रीसाठी दिली असून सय्यदची हॉटेलमधील व्यवस्थादेखील त्याच व्यक्तीने केली होती.
www.konkantoday.com