
दुकानांवरील निर्बंध न उठवल्यास येत्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधाऱ्यांवर बहिष्कार टाकू, दुकानदार संघटनेचा इशारा
बिगर अत्यावश्यक दुकानांच्या विचित्र वेळांमुळे व्यापाऱ्यांनी पंचवीस टक्के दुकाने बंद ठेवली आहेत. तर विकेंडला दुकाने बंद आणि लोकांची पर्यटनस्थळांवर गर्दी अशी स्थिती आहे. मुंबईची रुग्णसंख्या कमी झाली असूनही दुकानांवरील निर्बंध न उठवल्यास येत्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधाऱ्यांवर बहिष्कार टाकू, असा इशारा मुंबईतील दुकानदार संघटनेने दिला आहेफेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी पत्रकाद्वारे हा इशारा दिला आहे.मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या गेले पाच आठवडे लक्षणीयरित्या खाली आली आहे. त्यानुसार मुंबईला पहिल्या किंवा दुसऱ्या श्रेणीत टाकले पाहिजे. तरीही मुंबईला तिसऱ्या श्रेणीत ठेवले जात आहे, त्यामुळे दुकानांवर विनाकारण निर्बंध लादले गेले आहेत. अशा स्थितीत मुंबईतील रोजची रुग्णसंख्या दोनशेच्या खाली येण्याचा अट्टाहास सोडून दुकानांवरील निर्बंध उठवावेत, असेही फेडरेशनचे म्हणणे आहे.
www.konkantoday.com