खेर्डी ग्रामपंचायतीने माझ्यावर अन्याय केलेला नाही – राष्ट्रीय कबड्डीपटू अजिंक्य पवार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेर्डी ग्रामपंचायत लसीकरणासाठी मी गेलो होतो. त्यावेळी मला २१५ क्रमांकाचे कुपन मिळाले. मात्र २०८ क्रमांकापर्यंत आलेले डोस संपले. त्यामुळे मला लसीकरण डोस मिळाला नाही. यामध्ये खेर्डी ग्रामपंचायतीने माझ्यावर अन्याय केलेला नाही, असे मत राष्ट्रीय कबड्डीपटू अजिंक्य पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय खेळाडू अजिंक्य पवार यांच्यावर लसीकरणात खेर्डी ग्रामपंचायतीने अन्याय केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. याबाबत खुलासा करताना अजिंक्य पवार म्हणाले, आपण खेर्डी ग्रामपंचायतीत लसीकरणासाठी गेलो असता तिथे प्रशांत दाभोळकर यांनी मला २१५ क्रमांकाचे कुपन दिले होते. कुपन वाटण्यास सुरूवात झाल्यानंतर काही वेळाने मी ग्रामपंचायतीत गेलो होतो. लस मिळेल या शक्यतेने प्रशांत दाभोळकर यांनी तेथेच थांबण्याचा सल्ला दिला होता. मात्र २०८ जणांचे डोस झाल्यानंतर लस संपली. परिणामी मला लस मिळाली नाही.
www.konkantoday.com