खेडमध्ये धुवाँधार; जगबुडी आणि नारंगी नदीच्या पाणी पातळीत वाढ ,दापोली खेड मार्गावर झाडे पडली

रविवारी दुपारपासून खेड तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. पावसाबरोबर असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतुक ठप्प होवू लागली आहे. काल
सायंकाळी उशीरा खेड-चिपळूण मार्गावरील पशुराम घाटात दरडीची माती रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता.
मुसधार पावसामुळे शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होवू लागली असल्याने काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेले काही दिवस दडी मारलेल्या पावसाचे शनिवार पासून तालुक्यात
पुनरागमन झाले आहे. शनिवारी सायंकाळपासूनच पावसाचा रिपरिप सुरु झाली होती. मात्र रविवारी दुपारी पावसाचा जोर कमालीचा बाढलाआणि खेड तालुक्यातील जनजिनवन विस्कळीत होवू लागले.
रविवारी दुपारी सुरु झालेला मुसळधार पाऊस धुवाँधार कोसळत असल्याने नद्या नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. सह्याद्रीच्या खोऱ्यात वसलेल्या आबवली, बिरमणी, दहीवली या भागात पावसाचा जोर प्रचंड असल्याने जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी क्षणाक्षणाला वाढू लागली आहे. जगबुडीचे पाणी मटण मार्केट येथून शहरात येण्याची शक्यताअसल्याने या परिसरातील दुकानदार आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी आसरा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुसऱ्या बाजूला खेड-दापोली-मंडणगड या मार्गावरील नारंगी नदीच्या पाण्याच्या पातळतही वाढ होवू लागली असल्याने नदीपरिसरातील भातशेतीला धोका निर्माण झाला आहे. किनाऱ्यावरील भातशेतीला कवेत घेऊन नारंगी नदीचे पाणी दापोली नाका येथून शहरात घुसण्याची शक्यता असल्याने या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनाही नगरपालिका प्रशासननाने सतर्क राहण्याच्या इशारा दिला आहे.
गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाच्या जोडीला जोराचा वाराही पिंगा घालत असल्याने खेड-दापोली मार्गावर वृक्ष उन्मळुन पडण्याच्या घटना घडल्या आहेत. या मार्गावरील फुरुस या गावानजीक पहाटेच्या वेळेत रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडल्याने सकाळी हा मार्ग काही वेळेसाठी रहदारीसाठी बंद झाला होता. बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर कोसळलेला वृक्ष बाजूला केल्यावर या मार्गावरील वाहतुक सुरु झाली.
धुवाँधार पावसाचा परिणाम एसटी सेवेवरही होण्याची शक्यता आहे. पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्ते नादुरुस्त झाले असल्याने या गावांमध्ये एसटी सेवा सुरु ठेवायची की नाही याचा विचार महामंडळाकडून सुरु आहे. जर नादुरुस्त झालेल्या रस्त्यांवरून एसटीच्या बसेस न चालविण्याचा निर्णय घेतला गेला तर त्यांचा परिणाम सर्वसामान्यांनी जीवनवाहिनी असलेल्या एसटी सेवेवरही होणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button