रत्नागिरी तालुक्यात महामारीतील चार महिन्यातही १ हजार ११५ खरेदी व्यवहारांची (दस्त) नोंदणी
कोराेनाच्या काळातही घर, फ्लॅट, जमीन खरेदी तेजीत असल्याचे दिसत आहे.हक्काचे घर, फ्लॅट, जमीनी खरेदीसाठी लोक उत्साह दाखवू लागले आहेत कोरोना महामारीतून सावरत असल्याचे हे चित्र आहे. रत्नागिरी तालुक्यात गेल्या चार महिन्यांमध्ये खरेदी-विक्री व्यवसाय तेजीत आहे. महामारीतील चार महिन्यातही १ हजार ११५ खरेदी व्यवहारांची (दस्त) नोंद येथील दुय्यम निबंधक कार्यालयात झाली आहे. या दस्तांच्या माध्यमातून सुमारे ५ कोटींचा मुद्रांक शुल्क शासनाला प्राप्त झाला आहे.
www.konkantoday.com