मुंबईत आकर्षण ठरलेल्या एका मराठी माणसाने निर्मिती केलेल्या विजेवर चालणार्या बारा बग्ग्या सध्या टाळेबंदीमुळे अडचणीत
एकेकाळी मुंबईची ओळख असलेली व्हिक्टोरिया न्यायालयाच्या आदेशानंतर साधारण २०१५ पासून घोड्यांवर अत्याचार होतो, या कारणास्तव प्राणिप्रेमींनी आक्षेप घेतल्याने घोड्यांनी ओढली जाणारी व्हिक्टोरिया बंद झाली. इतिहासाच्या पानावरून ती पुसली जाणार, अशी रुखरुख मुंबईकरांना वाटत होती. परंतु व्हिक्टोरिया बग्गीतून फिरण्याचा आनंद अनुभवता यावा, याकरिता एका मराठी माणसाने विजेवर चालणाऱ्या बग्गी तयार केल्या.
घोड्यांच्या टापांचा टपटप आवाज करत धावणाऱ्या जुन्या काळातल्या ‘व्हिक्टोरिया’ची आठवण करून देणारी, पण विजेवर चालणारी बग्गी मार्च महिन्यात मुंबईत सुरू झाली, पण करोना टाळेबंदीमुळे पहिल्या टप्प्यातल्या बारा बग्गी सध्या जागेवरच थबकल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्च महिन्यात या गाड्यांच्या सफरीला हिरवा कंदील दाखवला होता. मात्र संध्याकाळी ४ ते पहाटे २ अशी वेळ त्यांना ठरवून देण्यात आल्यामुळे टाळेबंदीचा फटका बसून या बग्गीची रपेट सध्या बंदच पडली आहे.संध्याकाळी चार वाजल्यानंतर टाळेबंदीचे निर्बंध लागू असल्यामुळे आम्ही या बग्गी सुरू ठेवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया बग्गी चालवणाऱ्या कंपनीचे केतन कदम यांनी दिली. सध्या या गाड्या पालिकेच्या गॅरेजमध्ये उभ्या ठेवल्या आहेत, मात्र आम्हाला त्याची देखभाल करावी लागत आहे. त्यामुळे उत्पन्न घटलेले असले तरी खर्च मात्र तेवढाच करावा लागतो आहे, असेही त्यांनी सांगितले
www.konkantoday.com