मागील केवळ सहा महिन्यांत सिमेंटच्या दरात ४० टक्क्यांनी, तर स्टीलच्या दरात ५० ते ५५ टक्क्यांनी वाढ
करोना काळात उत्पादन शुल्क वा मागणीत कोणतीही वाढ झालेली नसताना सिमेंट आणि स्टीलच्या दरात भरमसाट वाढ होत आहे. मागील केवळ सहा महिन्यांत सिमेंटच्या दरात ४० टक्क्यांनी, तर स्टीलच्या दरात ५० ते ५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी, बांधकाम शुल्कात २०० ते २५० प्र.चौ. फूट रुपयांची वाढ झाली आहे. याचा फटका ग्राहकांना बसत आहे. ही कृत्रिम दरवाढ असून सिमेंट-स्टील कंपन्यांच्या मक्तेदारीविरोधात केंद्र सरकारकडे दाद मागण्यात येत आहे. पण केंद्राकडून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने आता बिल्डर-कंत्राटदारांच्या संघटनांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
www.konkantoday.com