
ते लहान आहेत, त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही,राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कुणाला हाणला हा टोला
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये पाठीत खंजीर खुपसला जातोय, असं वक्तव्य केलं होतं. नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील कुरबुरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं दिसून आलं. याबद्दलच आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी नाना पटोलेंबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
आज पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार यांनी नाना पटोले हे लहान आहेत, त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही, असं म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. तसेच अनेकांच्या शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे भुवया उंचावल्याचं पाहायला मिळत आहे.सध्या महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना गेल्या काही दिवसात वेळ आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लहान म्हटल्यामुळे अनेक उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहे. दरम्यान यासंबंधी नाना पटोले हे नेमकी काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षानेही हा मुद्दा पकडून धरून महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. पण शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर महा विकास आघाडी सरकारमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.
www.konkantoday.com