
गाडीला कोणते दोन बैल जोडावे याचा आधीच विचार करा”-भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा काँग्रेसला सल्ला
मुंबई काँग्रेसच्या वतीने शनिवारी मुंबईत इंधन दरवाढीविरोधात मोर्चा काढण्यात आला. यावेळी बैलगाडीतून काँग्रेस नेते मोर्चात सहभागी झाले होते. मात्र, ओझ्याने बैलगाडीच मोडली.घटनेचा व्हिडीओ ट्विट करत भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला अप्रत्यक्षरीत्या चिमटा काढत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना राजकीय सल्ला दिला आहे. उपाध्ये यांनी ट्वीट करत महाविकास आघाडीत सामील झालेल्या काँग्रेसला भविष्यातील वाटचालीबद्दलही इशारा दिला आहे.
“भाई जगतापजी, तोल सांभाळा. महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना राजकीय तोल गेलाच आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेसी कोसळात तसे राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावे याचा आधीच विचार करा”, असं केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.
www.konkantoday.com




