
ट्रेनमध्ये मिळणार ‘व्रताची थाळी’; IRCTCचा नवरात्री स्पेशल
आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व असते. याकाळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन देवीची विधिवत पूजा केली जाते.याकाळात नऊ दिवस देवीचे उपवासही केले जातात. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी भारतीय रेल्वेने खास सोय केली आहे. नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) व्रताच्या थाळीचा समावेश केला आहे. उत्सवानिमित्त ई-केटरिंगमध्ये ‘व्रत का खाना’ सेवेंतर्गत नवरात्र थाळीचा समावेश करण्याचा निर्णय ‘आयआरसीटीसी’ने घेतला आहे.
आयआरसीटीसीकडे वंदे भारतसह सर्व एक्स्प्रेसमध्ये जेवण, नाश्ता पुरवण्याती जबाबदारी आहे. सण-उत्सव असल्यास जेवणाचे खास आयोजन केले जाते. नवरात्रीतही प्रवाशांच्या जेवणाच्या गरजेनुसार व्रत का खाना अशी सेवा सुरू करण्यात आली आहे. नवरात्रीत प्रवाशांना आता उपवासाचे पदार्थही मिळणार आहेत. आयआरसीटीसीच्या या निर्णयामुळं प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. व्रत का खाना या थाळीत साबुदाणा खिचडी, सुका मखाणा, साबुदाणा नमकीन, बटाट्याची टिक्की, जिरे आलू, फ्रेंच फ्राइज, साबुदाणा वडा, फलहारी थाळी, मलाइ बर्फी, रसमलाई, मिल्क केक, साधी बर्फी, लस्सी, दही या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.
www.konkantofsy.com