
कुवारबाव वासीयांची सध्यातरी वाढीव पाणीपट्टीतून सुटका, कुवारबाव सरपंचांनी दिली नळपाणी योजनेच्या वाढीव दरवाढीला स्थगिती
रत्नागिरी शहराजवळील कुवारबाव ग्रामपंचायतीने केलेल्या पाणीपट्टीतील प्रचंड दरवाढीला लोकांच्या कडून मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू झाल्यानंतर शिवसेनेने देखील या दरवाढीविरोधात भुमिका घेतली आहे तर आघाडीचे संघटक व स्थानिक भाजप नेते सतेज नलावडे यांनी देखील ही दरवाढ रद्द न झाल्यास ग्रामपंचायतीसमोर उपोषणाचा इशारा दिला होता याबाबत कुवारबाव ग्रामपंचायतीच्या सभापती सौ मंजिरी पाडळकर यांनी याबाबत निर्णय घेऊन सध्या या नळपाणी पट्टीचा दरवाढीला स्थगिती दिली आहे पाणीपट्टीच्या दरवाढीबाबत फेरविचार करण्यासाठी हा विषय मासिक सभेच्या अजेंड्यावर ठेवण्यात आला असून तोपर्यंत वाढीव दराने बिले वितरित करण्यास स्थगिती देण्यात आल्याचे त्यानी नलावडे यांना पत्र देऊन कळविले आहे याबाबत मासिक सभेत निर्णय घेण्यात येणार आहे त्यामुळे आपणया विषयावर उपोषण करू नये व ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे त्यांनी म्हटले आहे
www.konkantoday.com
