सिटीस्कॅन इमारतीचे काम अंतीम टप्प्यात; खेडमध्ये लवकरच सिटी स्कॅन सेंटर


खेड : खेड तालुक्यातील रुग्णांना सिटी स्कॅनसारखी अत्यावश्यक सेवा विनाविलंब आणि कमीत कमी खर्चात उपलब्ध व्हावी यासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाशेजारी उभारण्यात येत असलेल्या सिटी स्कॅन सेंटरच्या इमारतीचे काम अंतीम टप्प्यात असून ऑगस्ट २०२१ अखेर इमारतीचे काम पुर्ण होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांच्याकडून उपलब्ध झाली आहे.

खेड तालुक्यात सिटी स्कनची सुविधा उपलब्ध नसल्याने येथील नागरिकांना सिटी स्कॅनसाठी इतरत्र जावे लागत असे. कोरोना काळात तर रुग्णांची सिटीस्कॅनअभावी फारच गैरसोय निर्माण झाली होती. कोरोनिाबाधित रुग्णांना सिटीस्कॅन करण्यासाठी धावपळ करावी लागली होती शिवाय आर्थिक भुर्दडही सोसावा लागला होता.
सिटीस्कॅन सारख्या अतिशय महत्वाच्या आरोग्य सुविधेअभावी खेडवासियांची होणारी गैरसोय लक्षात घेत खेड दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालय येथे सिटी स्कॅन उभारण्यात यावे यासाठी प्रस्ताव तयार करून तो शासनाच्या आरोग्य विभागाकडे सादर केला होता.
शासन दरबारी सादर केलेल्या प्रस्तावाला फेब्रुवारी २०२१ मध्ये मंजुरी मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांनी कळंबणी उपजिल्हा सणालय परिसरात असलेली एक जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवी इमारत बांधण्याचे काम हाती घेतले होते. गेले सहा महिने युद्धपातळीवर सुरु असलेले हे काम आता पूर्णत्वाकडे आले असून ऑगस्ट अखेर इमागचे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
1700 चौ “मी. ची ही इमारत असून या इमारतीचे काम पूर्ण होताच या ठिकाणी तात्काळ सिटी स्कॅन सेंटर सुरु करण्यात येणार आहे. आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नाने खेडमध्ये सिटी स्कॅनसासारखी सुविधा उपलबध होणार असल्याने खेडवासियांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
सिटी स्कॅन या सुविधेनंतर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात डायलेसिस या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे आमदार योगेश कदम यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button