
रत्नागिरी शहरात डेंग्यूच्या रूग्णांच्या संख्येत वाढ
रत्नागिरी शहरात प्रतिदिनी शंभराहून अधिक डेंग्यूचे रूग्ण सापडत असून पालिकेच्यावतीने अद्यापही कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. जिल्हा शासकीय रूग्णालयात डेंग्यूग्रस्त रूग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. तज्ञ डॉक्टर नसल्याने डेंग्युग्रस्त रूग्णांवर योग्य उपचार करण्यास विलंब होत आहे. खाजगी रूग्णालय फुल्ल झाली असून डेंग्यूग्रस्त रूग्णांना उपचारासाठी कोठे दाखल करावे, असा प्रश्न रूग्णालय व्यवस्थापनासमोर पडला आहे.डेंग्युग्रस्त रूग्णांना प्लेटलेटची गरज असेल तरच त्यांना खाजगी रूग्णालयात दाखल केले जात आहे. शासकीय रूग्णालयात डेंग्युग्रस्त रूग्णांवर योग्यप्रकारे उपचार होत नसल्याने नातेवाईकांनी त्यांना खाजगी रूग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. www.konkantoday.com