
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये नवा मेकाट्रॉनिक्स अभ्यासक्रम
शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथे मेकाट्रॉनिक्स अभियांत्रिकी हा नवा अभ्यासक्रम सुरू होत आहे. यात ६० प्रवेश क्षमता असुन अभ्यासक्रम ३ वर्षांचा आहे. या वर्षीपासून महाराष्ट्रातील तंत्रनिकेतनांमध्ये फक्त पाच ठिकाणी हा अभ्यासक्र्रम सुरू होणार आहे. त्यात येथील शासकीय तंत्रनिकेतन असल्याने या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य औ. म. जाधव यांनी केले आहे.
www.konkantoday.com