पूजा करताना कपडे पेटल्यामुळे मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त के. नलिनाक्षन यांचे निधन
मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त के. नलिनाक्षन यांचे निधन झाले. घरात पूजा करताना कपडे पेटल्यामुळे नलिनाक्षन गंभीररित्या भाजले होते. मात्र भायखळ्याच्या मसीना रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७९ वर्षांचे होते.के. नलिनाक्षन बुधवारी सकाळी राहत्या घरी पूजा करत होते, त्यावेळी त्यांच्या लुंगीने पेट घेतला. यामध्ये ८०ते ९० टक्के भाजले होते. त्यांना तातडीने मसीना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु शुक्रवारी उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
www.konkantoday.com