..तर पालिकेची निवडणूक स्वबळावर

आमदार शेखर निकम यांच्या उप स्थितीत पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत झाला निर्णय

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे आघाडी सरकार अस्तित्वात आले. याच धर्तीवर चिपळूण पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व्हावी, अशी आमची इच्छा आहे. याबाबत कॉंग्रेस व शिवसेनेशी चर्चा केली जाईल. त्यांचा नकार आल्यास स्वबळावर पालिकेची निवडणूक लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
चिपळूण पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली. या वेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, माजी सभापती शौकत मुकादम, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, शिरीष काटकर, सुचयअण्णा रेडीज, माजी नगराध्यक्षा सावित्री होमकळस, हिंदुराव पवार आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button