टाळेबंदीच्या काळात विविध नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यामार्फत कारवाई,तीन महिन्यात साडेतीन लाखांचा दंड वसूल

टाळेबंदीच्या काळात विविध नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यामार्फत कारवाई करण्यात आली. यामध्ये ३ लाख ६७ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई एप्रिल २०२१ ते जून २०२१ या कालावधीत करण्यात आली.
या कालावधीत वाहतुकीचे नियम मोडणार्‍या ५८३ चालकांकडून २ लाख ६ हजार रुपये, मास्क न वापरता फिरणार्‍या २३६ जणांकडून १ लाख १७हजार १०० रुपये, नियम भंग करणार्‍या दुकानदारांकडून ४४ हजार रुपये असे एकूण ३ लाख ६७ हजार १०० रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यातून देण्यात आली. याशिवाय नियम भंग करणार्‍या १६ दुकानदारांवर केस दाखल करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button