
जोपर्यंत आज्ञा असेल तोपर्यंत आम्ही विरोधात बसणार -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
केंद्र सरकारमध्ये फेरबदल झाला आहे. नव्या विस्तारात महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची मंत्रिपदं मिळाली आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ताबदलाच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. जोपर्यंत आज्ञा असेल तोपर्यंत आम्ही विरोधात बसणार आहोत, असं मोठं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
www.konkantoday.com