
जिल्हा परिषद भवनावरील सोलर पॅनल दुरूस्तीकडे अद्यापही संबंधित विभागाचे दुर्लक्ष
तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्हा परिषद भवनावर बसविण्यात आलेल्या सोलर विद्युत संचाच्या १४ पॅनेलसह अन्य साहित्याचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पॅनल दुरूस्तीकडे अद्यापही संबंधित विभागाने लक्ष दिलेले नाही.
शासकीय योजनेंतर्गत बसविण्यात आलेल्या सौरऊर्जा पॅनेलचा विमा काढल्याने दुरूस्तीसाठीचा निधी संबंधित कंपनीकडून मिळणार आहे. दुरूस्तीच्या विमा रकमेतून नुकसानीची रक्कम वजा केली जाणार आहे. परिषद भवनावर १३० किलो वॅट क्षमतेचा सोलर विद्युत संच बसविण्यात आला असून त्यावर ५८ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
www.konkantoday.com