जागतिक स्तरावर गुहागरच्या ओंकार गुरवने दाखविली चमक
स्टोरी मिरर या ऑनलाइन पोर्टल वर मातृदिनानिमित्त सुपर मॉम ही जागतिक काव्यलेखन स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये दोन हजार हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता त्यात जागतिक स्तरावर कु. ओंकार गुरव ने १४ वा क्रमांक पटकावत आपल्या कवितेला टॉप-20 मध्ये स्थान मिळवून दिले आहे.
तसेच मुंबई विद्यापीठ उपकेंद्र रत्नागिरी येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . त्यात निबंध स्पर्धेत प्रथम तर कविता स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
भारतीय जनता युवा मोर्चा गुहागर शहर, शिवसेना युवासेना गुहागर शहर, गुरववाडी मित्र मंडळ गुहागर, खरे-ढेरे-भोसले महाविद्यालय गुहागर यांच्यातर्फे ओंकारचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
ओंकार च्या या यशाचे शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सर्वत्र विशेष कौतुक केले जात आहे.
www.konkantoday.com