चंद्रपूर जिल्ह्यातील बारमालकाने केली मंत्र्यांच्या तसबिरींची ओवाळून आरती
पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी चर्चेचा विषय ठरली होती. या जिल्ह्यात लागू करण्यात आलेली दारुबंदी उठवण्यात यावी अशी मागणी केली जात होती. अखेर जिल्ह्यातील दारुबंदी सहा वर्षानंतर उठविण्यात आली. याबाबत राज्य सरकारने शासन निर्णय काढून अधिकृत शिक्कामोर्तब केलं.
दारुबंदी उठवल्यानंतर जिल्ह्यातील बंद झालेली दारुची दुकानं, बार आणि रेस्टॉ़रंट सुरु झाले असून एका बार मालकाने चक्क पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा फोटो लावून आरती केली. चंद्रपूर शहराच्या वेशीवर असलेल्या ग्रीन पार्क बार रेस्टॉरंटमध्ये पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची तसबीर लावली.बार उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी आनंदात असलेल्या बार मालकाने विजय वडेट्टीवार यांच्या फोटोसमोर आरती केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे
www.konkantoday.com