गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणार्या गणेशभक्तांना परिवहन मंत्र्यांचा सल्ला
करोना निर्बंध असतानाही कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा करताच आरक्षणासाठी गणेशभक्तांची झुंबड उडाली. कोकणात जाणाऱ्या काही गाड्यांची प्रतीक्षा यादी तर एका दिवसात ३००च्याही पुढे गेली आहे. येत्या १० सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सवानिमित्त मध्य आणि कोकण रेल्वेने ७२ विशेष गाड्यांची घोषणा के ली. या गाड्या ५ सप्टेंबरपासून सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी आरक्षण सुरू होताच काही गाड्यांसाठी प्रतीक्षा यादीही लागली आहे.
गेल्या वर्षी १८४ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या होत्या. परंतु १४ दिवसांच्या विलगीकरणाच्या नियमामुळे अनेकांनी आठ ते दहा दिवस आधीच खासगी वाहनांनी कोकण गाठलेत्यामुळे कोकण रेल्वेला अल्प प्रतिसाद मिळाला होता. यंदा कोकण रेल्वेने ७२ विशेष गाड्यांची घोषणा केली असून त्याच्या आरक्षणाला ८ जुलैपासून सुरुवात झाली.रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील करोना रुग्णांची संख्या म्हणावी तशी अद्याप कमी झालेली नाही. त्यामुळे या जिल्ह्यांचा आढावा घेऊन गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी नियमावली निश्चित केली जाईल, असे परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले
www.konkantoday.com