
गणपतीपुळे, चाफे, देऊड गावांसाठी ३० कोटीच्या पाणीयोजने बाबत निविदा प्रक्रिया पूर्ण
गणपतीपुळे, चाफे, देऊड गावांसाठी ३० कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर झाली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून आठजणांचे अर्ज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या रत्नागिरी उपविभागाकडे प्राप्त झाले आहेत.
मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गणपतीपुळे पाणी याजनेचे उदघाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी पाणी योजनेसाठी पुढाकार घेतला आहे. गणपतीपुळे गावातील पाच हजार, चाफे गावातील २४००, देऊड गावातील ३४०० नागरिकांसह हॉटेल, लॉजिंग व्यावसायिक, व्यापारी आदींना फायदा होणार आहे.
www.konkantoday.com




