
कोरोनामुळे शालेय पोषण आहार ऐवजी रक्कम देण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे पालकांना भुर्दंड
रत्नागिरी – कोरोनामुळे शालेय पोषण आहार मुलींना देता आला नाही. त्यामुळे आहाराची रोख रक्कम दिली जाणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेत खाते काढण्यासाठी किमान एक हजार रुपये खात्यात भरावे लागणार आहेत. हजार रुपये खर्च करून पालकांच्या हातात आहाराचे १५५ रुपये मिळणार आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच पालकांना तांदूळ वाटप करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
www.konkantoday.com