खेड भोस्ते घाटात स्वप्नात मृतदेह दिसला तोच योगेश आर्या आता गायब झाल्यामुळे खळबळ.

खेड भोस्ते घाटात स्वप्नात मृतदेह दिसला तोच योगेश आर्या आता गायब झाल्यामुळे खळबळ उडाली आहे स्वप्नामध्ये दिसलेला मृतदेह खरंच सापडल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी रत्नागिरीच्या खेडमध्ये घडला होता. या प्रकरणाचं गूढ कमी होताना दिसत नाहीये.ज्या तरुणाला स्वप्नात मृतदेह दिसला तोच तरुण आता गायब झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. योगेश आर्या या सावंतवाडीमधील आडगावच्या तरुणाला रेल्वे स्थानकासमोरील डोंगरामध्ये एक व्यक्ती मदतीसाठी याचना करत असल्याचं स्वप्न वारंवार पडत होतं, याबाबत योगेश आर्याने पोलिसांकडे धाव घेतली. यानंतर सिंधुदुर्गाच्या पोलिसांनी ही माहिती खेड पोलिसांना दिली.सिंधुदुर्गाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खेड पोलीसही घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनाही धक्का बसला, कारण पोलिसांना भोस्ते घाटातल्या डोंगरामध्ये 18 सप्टेंबरला मानवी शरिराची कवटी आणि कुजलेल्या अवस्थेतला सांगाडा सापडला आणि याप्रकरणाला भलतंच वळण लागलं.मृतदेह सापडल्याच्या 12 दिवसानंतरही अद्याप हा मृतदेह नेमका कुणाचा आहे, याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलेलं नाही, मात्र ज्या योगेश आर्याला हे स्वप्न पडलं तोच आता मागच्या दोन दिवसांपासून आऊट ऑफ रेंज झाला आहे. आता सापडलेला मृतदेह कुणाचा? हे शोधण्यासोबतच योगेश आर्या कुठे गेला? याचा तपास करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button