
बेकायदा जनावरांची वाहतूक करणाऱ्या टोळक्यांवर राजापूर पोलिसांनी केली कारवाई
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेकायदा जनावरांची वाहतूक होण्याचे प्रकार उघड झाले असून आता राजापूर तालुक्यात.अशाचप्रकारे बेकायदा जनावरांची वाहतूक करण्याचा प्रयत्न गुरुवारी (८ जुलै) सकाळी ६.३० वाजता केळवली कॅन्टिन येथे उघडकीस आला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी दिनेश अनंत पावसकर (रा. परटवली) यांनी राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. जनावरांच्या वाहतुकीप्रकरणी टेम्पोचालक रोहित कल्लापा नाईक (वय २४, रा.कागवलाड, ता. उगार, जि. बेळगाव) व सरफराज चांदमिया ठाकूर व हाफिज चांदमिया ठाकूर व चांदमिया अब्बास ठाकूर (सर्व रा. परटवली, राजापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील आठ गाईंची पोलिसांनी सुटका केली आहे.
www.konkantoday.com