
बजाज कंपनी व राजापूर तालुका रिक्षा चालक-मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुक्यातील गरजू रिक्षा व्यावसायिकांना अन्नधान्याच्या किटचे वाटप
कोरोना महामारी आणि त्यामुळे निर्माण झालेली लॉकडाऊनची परिस्थिती या काळात बजाज कंपनी व राजापूर तालुका रिक्षा चालक-मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुक्यातील गरजू रिक्षा व्यावसायिकांना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
राजापूर शहरातील जवाहर चौक पिकअप शेड समोर हा कार्यक्रम झाला. राजापूरच्या प्रभारी पोलीस निरीक्षक शैलजा सावंत, राजापूर तालुका रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष अभिजीत गुरव, सल्लागार अॅड.सुशांत पवार, सचिव संतोष सातोसे, राजापूर बँक ऑफ महाराष्ट्रचे शाख व्यवस्थापक गौरव देशपांडे आदी मान्यवरांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले.
www.konkantoday.com