
केंद्राच्या योजनेंतर्गत राज्यातील अंगणवाडयांमध्ये पाळणाघर सुरू करण्यास मान्यता.
मिशन शक्ती या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रामध्ये पाळणाघर सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.या योजनेंतर्गत राज्यात ३४५ अंगणवाडी कम क्रेच सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून यापुढे जसजशी मंजुरी देण्यात येईल तसतसे ही केंद्रे वाढवण्यात येतील. या योजनेत पाळणा सेविका व पाळणा मदतनीस यांची प्रत्येकी एक पद निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पदांसाठी नियुक्तीच्या अटी, शर्ती तसेच ही पदे बाह्य स्वरूपाद्वारे अथवा प्रचलित पद्धतीप्रमाणे भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना शासनाकडून यथावकाश निर्गमित करण्यात येणार आहेत. प्रतिपाळणा साधारण वार्षिक ३ लाख ३५ हजार ६०० एवढा खर्च येणार असून त्यापैकी ४० टक्के एवढा राज्य सरकार तर ६० टक्के एवढा केंद्र सरकार वाटा देणार आहे.www.konkantoday.com