दरोडा टाकून व्यापाराला लुटले वरती पाच कोटीची खंडणी मागितली

संगमेश्वर तालुक्यातील देवरुख नजीकच्या कांजीवरे या भागात भंगार व्यवसाय करणार्‍या व्यापाऱ्याच्या घरावर बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणार्‍या दरोडेखोरांनी पाच लाखाचा ऐवज लंपास केला आहे शिवाय या व्यापाऱ्या कडून दोन दिवसांत पाच कोटींची खंडणीची मागणी केल्याचा प्रकार घडला आहे त्यामुळे दरोडा टाकणारे व्यापाऱ्यांच्या ओळखीचे किंवा त्याच्यावर पाळत ठेवणाऱ्या असावेत असा अंदाज आहे त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे
संगमेश्वर तालुक्यातील देवरुख नजीकच्या कांजीवरे या भागात आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी नुरल होदा मशहुर अली सिद्दिकी यांच्या घरावर दरोडा टाकून पिस्तुलाचा धाक दाखवत सुमारे ५ लाखांचे सोन्याचे दागिने, मोबाईल आदि वस्तू चोरुन नेल्या. चोरट्यांनी नुरल सिद्दिकी यांच्याकडे दोन दिवसात पाच कोटीच्या खंडणीची मागणी करुन पलायन केले. या घटनेने संगमेश्वर तालुक्यात एकच खळबळ उडाली
देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, नुरल सिद्दिकी यांचा देवरुख नजीकच्या कांजीवरा येथे भंगार व्यवसाय असून तेथेच ते वास्तव्याला असतात. आज पहाटे तीनच्या सुमारास चार अज्ञात इसमांनी नुरुल यांच्या घराचा मागील दरवाजाची कडी लोखंडी हत्याराने तोडून घरात प्रवेश केला.नुरुल यांना चाहूल लागताच चारही दरोडेखोरांनी नुरुल यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणी नंतर नुरुल यांच्यासह त्यांच्या पत्नीला पिस्तुलाचा धाक दाखवून बेडरुम मध्ये प्रवेश केला. स्क्रू ड्रायव्हरने लोखंडी कपाटे उघडून त्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल आदि सुमारे ५ लाख ३८ हजार १०० रुपयांचा माल चोरुन नेला.
नुरुल सिद्दिकी यांचा भाचा असादउल्ला याच्या तोंडाला दरोडेखोरांनी चिकटपट्टी लावली आणि सर्वांचे हातपाय दोरीने बांधून ठेवले. तोंडाला कपडा बांधलेला असल्यामुळे दरोडेखोरांचे चेहरे नुरुल यांना निट दिसून आले नाहीत. दरोडेखोरांनी पाच लाखांचा ऐवज घेऊन पोबारा करताना नुरुल यांच्याकडे दोन दिवसात पाच कोटींची खंडणी देण्याची मागणी केली आहे. या घटनेने घाबरलेल्या नुरुल सिद्दिकी यांनी सकाळ होताच देवरुख पोलीस ठाणे गाठले आणि दरोड्याबाबत पोलिसांना कल्पना दिली.
देवरुख पोलीस ठाण्याचे निरीक्षक मारुती जगताप यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. नुरुल सिद्दिकी यांच्या कडून पोलिसांनी दरोडेखोरांचे वर्णन, त्यांची भाषा, उंची आदि माहिती घेतली आहे. श्वान पथकाने देखील घटनास्थळी येवून माग काढला. मात्र दरोडेखोर वाहनातून आले असल्याने अधिक माग काढणे शक्य झाले नाही.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button