चिपळूण शहरातील माऊली गृहनिर्माण संस्थेचा इमारतीचा काही भाग खचला ,आमदार भास्करराव जाधव यांची घटनास्थळाला भेट
चिपळूण शहरातील चिंचनाका येथील डॉ. पाटणकर हॉस्पिटलसमोरील माऊली सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीचा काही भाग आज खचला घटना कळताच विधानसभा अधिवेशनानंतर आजच चिपळूणमध्ये दाखल आमदार श्री. भास्करराव जाधव हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि पाहणी केली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. वैभव विधाते व अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतली आणि ताबडतोब उपाययोजनेच्या सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना तालुका प्रमुख श्री. संदीप सावंत, श्री. फैसल कासकर, विभागप्रमुख श्री. संदीप घाग, श्री. पिंट्या निवळकर, वेळनेश्वरचे श्री. सतीश मोरे आदी सहकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
www.kontoday.com