
चार वैद्यकीय अधिकार्याच्या राजीनाम्यामुळे या तालुक्यातली आरोग्य यंत्रणा गेली व्हेंटिलेटरवर
कोरोना काळात राजापूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटीलेटवर असताना त्याही परिस्थितीत २४ तास काम करत राजापूर ग्रामीण रूग्णालय व ओणी कोवीड रूग्णालयात कोरोना बाधित रूग्णांना दिलासा देणाऱ्या राजापूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. राम मेस्त्री यांनी आपल्याकडी वैद्यकिय अधिक्षक पदाचा अतिरिक्त अधिभार काढून घ्यावा असे लेखी पत्र जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले आहे.
ओणी कोवीड रूग्णायातील अपुरे वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी व राजापूर ग्रामीण रूग्णालयातील अपुरे वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यामुळे आपणावर २४ तास कामाचा ताण येत असून मानसिक दडपणाखाली काम करावे लागत आहेतरी आपल्याकडील राजापूर ग्रामीण रूग्णालयाचा वैद्यकिय अधिक्षक पदाचा अधिभार काढून घ्यावा अशी मागणी डॉ. मेंस्त्री यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिलेल्या पत्रात केली आहे.
राजापूर तालुक्यातील ओणी येथील कोविड रूग्णालयात चारपैकी एका वैद्यकीय अधिकार्याने राजीनामा दिला. उर्वरित तीन वैद्यकीय अधिकारी हे १८ जुलैनंतर कामकाज पाहणार नाहीत, असे त्यांनी कळविले आहे. त्यांनी १८ जूनला राजीनामा दिला. राजापूर ग्रामीण रूग्णालयातील दोन्ही वैद्यकीय अधिकारी जात आहेत. अशा अपुर्या मनुष्यबळावर दोन रूग्णालये काय पण एक रूग्णालयही चालविणे मला शक्य नाही, असे नमूद करीत राजापूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. राम मेस्त्री यांनी त्यांच्याकडील वैद्यकीय अधिकपदाचा अतिरिक्त भार काढून घ्यावा, असे पत्र जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले. त्यामुळे राजापुरात पेच निर्माण झाला आहे.
www.konkantoday.com
