ग्रामपंचायतीच्या वाढीव पाणीपट्टीला शिवसेनेचाही विरोध ,कोणीही ग्रामस्थांनी वाढीव पाणीपट्टी भरू नये असे आवाहन
कुवारबाव ग्रामपंचायतीने अचानक केलेल्या वाढीव अन्यायकारक पाणीपट्टीला आता शिवसेनेनेही जोरदार विरोध केला असून शिवसेना तालुकाप्रमुख बंडय़ा साळवी यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेना पार्टीच्या मीटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आला शिवसेना ही नेहमीच ग्रामस्थांच्या बरोबर आहे त्यामुळे ग्रामस्थांनी वाढीव पाणीपट्टीचे बिले भरू नये असे आवाहनही शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे
कुवारबाव ग्रामपंचायतीच्या भाजपच्या सरपंच सौ मंजिरी पडळकर व पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही पाणीपट्टीची वाढ शिवसेनेने केले असून आपला त्याला विरोध असल्याचे सांगितले होते या संदर्भात शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंडय़ा साळवी उपतालुकाप्रमुख शेखर घोसाळे विभागप्रमुख प्रकाश रसाळ विभाग कार्यालय प्रमुख प्रकाश शिंदे त्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत शिवसेना सदस्यांची पार्टी मीटिंग झाली या बैठकीला पंचायत सदस्या सौ जयश्री जोशी ,ज्येष्ठ शिवसैनिक जयंत जोशी व माजी सरपंच विनोद झाडगावकर आदीजण उपस्थित होते.
या बैठकीत भाजपा सरपंच यांनी शिवसेनेने केलेले आरोप फेटाळून लावण्यात आले ग्रामपंचायतीने केलेल्या वाढीव पाणीपट्टीला शिवसेनेचा विरोध आहे सरपंचांनी आरोप केल्याप्रमाणे शिवसेनेचे पंचायतीत बहुमत नाही शिवसेनेचे सात सदस्यच आहेत त्यामुळे ही दरवाढ आम्ही केलेली नाही नळपाणी योजना तोट्यात असतानादेखील शिवसेनेची याआधी सत्ता असताना ग्रामस्थांचे हित पाहून शिवसेनेने कधीच पाणीपट्टीत दरवाढ केलेली नाही शिवसेनाही नेहमीच ग्रामस्थांच्या बरोबर आहे त्यामुळे या वाढीव पाणीपट्टीला शिवसेनेचा विरोधच राहणार आहे.
सत्तेत असलेली ही मंडळी कुवारबाव ग्रामस्थांना खोटी आश्वासने देऊन सत्तेत आली यानी मिळेल तिथे घोटाळा सुरू केला आणि आता त्याची चर्चा सुरू झाल्यावर ग्रामस्थांचे लक्ष विचलित करण्यासाठी व नैराश्येपोटी शिवसेनेवर खोटे आरोप केले जात आहेत कुवारबाव वासीय सुज्ञ आहेत त्यामुळे खरे काय खोटे काय हे त्यांना माहिती आहे
कुवारबावचा विकास शिवसेनेच्या माध्यमातूनच झाला असल्याचे सर्वांना माहिती आहे शिवसेना ही माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने चालणारी संघटना आहे आमचे पदाधिकारी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य नामदार उदय सामंत व खासदार विनायक राऊत त्यांचे मार्गदर्शन घेऊन विकास करीत असतो त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून आलेला विकास निधीच्या माध्यमातून विकासकामांचे भूमिपूजन करणे हा आमचा अधिकार आहे असे या पार्टी मिटींगमध्ये मांडण्यात आले.
शिवसेना ही नेहमी ग्रामस्थांत बरोबरच राहत असल्याने या वाढीव पाणीपट्टीला शिवसेनेचा कायम विरोधच राहणार आहे त्यामुळे ग्रामस्थांनी ही वाढीव पाणीपट्टी बिले भरू नये काहीही झाले तरी ही वाढ शिवसेनाच रद्द करेल असा विश्वास या मिटींग मध्ये देण्यात आला या पार्टी मिटींगला जीवन कोळवणकर नरेश विलणकर साै स्नेहल वैशंपायन ,साै. विलणकर ,सौ साक्षी भुते ,सौ दुधवाडकर ,व चेतन सावंत हे सदस्य उपस्थित होते
www.konkantoday.com