
खोल समुद्रात अडकून पडलेल्या मच्छिमारी नौका तटरक्षक दल व जेएसडब्ल्यूच्या टगच्या सहाय्याने किनाऱयावर ,११ खलाशांचे प्राण वाचले
सध्याच्या वादळी वातावरणात रत्नागिरी जवळील भगवती बंदरा पासून आतमध्ये खोल समुद्रात इंजिन बंद पडलेल्या मच्छीमारी नौकेला आठ तासांच्या परिश्रमानंतर तटरक्षक दल व जेएसडब्ल्यूचा टग यांच्या मदतीने किनाऱयावर आणण्यात आले.यामुळे नौकेवर असलेल्या ११ खलाशांचे प्राण वाचले.सध्या बंगलाच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळामुळे खोल समुद्रात वादळी वारे निर्माण झाले आहे.मुंबई येथील खोल समुद्रात मच्छीमार साठी आलेली विजया महेश्वरी या मच्छिमारी नौकेचे इंजिन बंद पडले त्यामुळे नौका भर समुद्रात हेलकावे खाऊ लागली नौकेवरील तांडेल यांच्या वतीने मदतीचा संदेश मिळाल्यानंतर महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ.संजय उगलमुगल यांनी रत्नागिरीत तटरक्षक दलाशी संपर्क साधला. तटरक्षक दलाने आपली नौका घटनास्थळी नेली दरम्यान जेएसड ब्ल्यू कंपनीच्या
टग ही घटनास्थळी आला .या ट्गच्या सहाय्याने ही बंद पडलेली मच्छीमारी नौका आठ तासाच्या मेहनतीनंतर आज सकाळी जयगड बंदरात सुरक्षित आणण्यात आली. तटरक्षक दल व जेएसडब्ल्यूने राबवलेल्या मोहिमेमुळे नौका त्यावरील खलाशी सुरक्षितरित्या किनाऱ्यावर येऊ शकले
www.konkantoday.com