
काेराेनाच्या व वादळाच्या पाश्र्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकही मंत्री न फिरकल्याने शौकतभाई मुकादम वरिष्ठांकडे तक्रार करणार
कोरोनाचा कहर, जिल्ह्याला वादळाचा बसलेला तडाखा या पार्श्वभूमीवर राज्याच्या मंत्री मंडळातील राष्ट्रवादीचा एकही मंत्री जिल्ह्यात फिरकलेला नाही. वादळातील बाधितांना दिलासा देण्याबरोबरच कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यानी जिल्ह्यात येणे आवश्यक होते. याबाबत आपण पक्षाचे अध्यक्ष खा. शरदराव पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे चिपळूणचे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी सांगितले.
www.konkantoday.com