आ. राजन साळवी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार

आमदार राजन साळवी यांचा आज शुक्रवारी ९ जुलै रोजी होणार्‍या ५६ व्या वाढदिवसानिमित्त राजापूर, लांजा, साखरपासहित रत्नागिरीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी ९ जुलै रोजी राजापुरातील पंचायत समितीच्या किसान भवन सभागृहात व लांजामध्ये शहरातील आग्रे सभागृह येथे व साखरपा विभागामध्ये स्वामी समर्थ हॉल येथे सायंकाळी ४ वा. होणार्‍या कार्यक्रमांमध्ये कोविड योद्ध्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात येणार आहे.
रत्नागिरी शहरात शिवसेना प्रणित रिक्षा सेना टॅक्सी व विद्यार्थी वाहतूक सेना आयोजित इन्फिगो आय केअर सेंटरच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर होणार आहे. कोविड आजाराचे गांभीर्य लक्षात घेता पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक व हितचिंतकांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमांव्यतिरिक्त केक कापून समारंभ साजरा करू नये तसेच कोणीही पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊ नयेत, असे आवाहन आमदार राजन साळवी यांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button