
आरोपीला अटक केल्यावर आरोपीऐवजी रायगड पोलिसांची झोप उडाली
रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रत्नागिरी येथून मोटारसायकलवर व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन जाणार्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अब्दुल जाफर सुर्वे या व्यक्तीला जेरबंद केले. त्याच्याकडून पाच किलो वजनाची अंदाजे पाच कोटी रुपये किमतीचे उलटीसह मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केली. गोरेगाव पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर न्यायालयात हजार करण्यापूर्वी या तस्कराची वैद्यकीय तपासणी केली. मेडिकल केल्यानंतर पोलिसांच्या पायाखालची वाळूच सरकली. तस्करी करणारा वैद्यकीय तपासणीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याला तातडीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.कोरोना निगेटिव्ह अहवाल येत नाही तोपर्यंत या तस्करावर उपचार करण्यात येऊन त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणारआहे.
www.konkantoday.com
